■ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर कारवाई
करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी
वर्धा (Wardha ) हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग (National Highway ) क्रमांक ४४ वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डापुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदरावर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे बांधकामाला फक्त दोन वर्षे झाले आहेत. पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. काश्मीर ते कन्याकुमारीला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक अहोरात्र सुरु असते. या खड्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा निदर्शनास येत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकीचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. यासोबतच महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतात. सध्या परिस्थितीत झालेल्या खड्डयाची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी व राष्ट्रीय प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party ) तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले (Atul Vandile) यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेव गौळकार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदीले,
उडानपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता
हिंगणघाट ( Hinganghat ) शहरातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील नांदगाव चौक येथील उड्डाणपूल मागील तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. वाहतुकीसाठी सुरु झालेला हा उड्डाणपूल सुरु होताच विविध रोडच्या कामामुळे रस्ता बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. यादरम्यान अनेकदा या उडानपुलाची डागडुजी करण्यात आली. मात्र आता आरपार खड्डा पडलेला आहे. या उडानपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिली. जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, समुद्रपुर तालुका बूथअध्यक्ष गणेश वैरागडे, तालुका उपाध्यक्ष संजय लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अमोल बोरकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, सिद्धार्थ मस्के, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, उपसरपंच प्रवीण कलोडे, सुनील भूते, वाहतूक सेल विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे, जगदीश वांदिले, कुणाल येसंभरे, प्रशांत ऐकोनकर, उमेश नेवारे, अनिल भूते, विपुल थुल, अनिल आडकीने, समीर चापले, आशिष शेंडे, बच्चू कलोडे, संतोष चौधरी, पंकज भट, रत्नाकर पाटील, अमोल मुडे, बंडूजी लिहितकर, सुशील घोडे, शेखर ठाकरे, राहुल जाधव, मो. शाहीद, राजू मुडे, दिपक चांगलं, आकाश हुरले, आदित्य बुट्टे, आदी का कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)