– तुरीची भाववाढ बियाणे कंपन्यांच्या डोळ्यात
– तुर बियाण्याच्या दरात किलोमागे शंभर रुपयांनी वाढ
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha) : यावर्षी बियाण्याच्यादरवाढीने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तुरीच्या बियाण्याच्या दरात किलोमागे तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुरीच्या लागवड खर्चात वाढ होणार आहे. याकरिता मागील वर्षीचे तुरीचे घटलेले उत्पादन आणि बाजारात वाढलेले तुरीचे दर ही कारणे दिली जात आहेत. तुरीच्या वाढलेल्या दराचा निकष लावल्या जात असला तर अनेकांना तूर पिकलीच नाही आणि अनेकांना सात ते आठ हजार रुपयांपर्यंत दराने विकावी लागली. अशात बियाण्याची दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारीच आहे. मागील वर्षी तुरीच्या उत्पादनात नैसर्गिक कारणांनी घट झाली.
– वर्धा जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन पाठोपाठ तुरीची लागवड होते.
मोठ्या संख्येने शेतकरी (Farmer ) तुरीची लागवड करतात. मात्र यावर्षी तुरीच्या बियाण्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर होणार आहे
– मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादनात घट आली.
त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. अशात आधीच नुकसान झालेले असताना आणि आर्थिक अडचणीत असताना कंपन्यांनी केलेली दरवाढ शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणारी आहे.
सुरूवातीला कमी त्यानंतर सलग पाऊस, पाऊस, मोठ्या प्रमाणात आदी कारणांचा तुरीच्या परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन कमी झाले. यावर्षी चक्क १०० रुपयांपर्यंत प्रती असे असताना यावर्षी तुरीचे भाव वाढले. किलोमागे दरवाढ करण्यात आली आहे.
पाऊस, तुरीचे दर प्रतिक्विंटल बारा हजार अवकाळी रुपयांपर्यंत पोहोचले. तुरीचे बाजारभाव ( Market price ) पडलेले धुके तेजीत असल्याने इकडे बियाण्याच्याही पिकावर दरात वाढ झाली. मागील वर्षी तुरीचे अनेक बियाणे २५० रुपये किलोपर्यंत होते. मात्र त्यात ज्या कंपन्यांच्या बियाण्याला शेतकऱ्यांची पसंती जास्त असते, अशा कंपन्यांच्या दरात थेट शंभर रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात येते. तुरीच्या बियाण्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. कंपन्यांनी तुरीच्या बियाण्याच्या दरात वाढ केल्यामुळे तुरीच्या उत्पादन खर्चातदेखील वाढ होणार आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बजेटवर होणार आहे. तुरीच्या बियाण्याच्या दरात प्रती किलो शंभर रुपयांची दरवाढ केल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे