– वर्धा जिल्हा राज्यात चौथा तर नागपूर विभागात दुसरा क्रमांक
– वर्धा जिल्ह्या राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये
देशोचती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha ) :- महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा ( Health care ) अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद (Zilla Parishad) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (Primary Health Centres) सर्व सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक तसेच मुलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०२३-२४ चे जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरविण्यात आलेल्या मुलभुत सुविधामध्ये वर्धा जिल्हा राज्यात चौथा तर नागपूर विभागात (Nagpur Division) दुसरा क्रमांक आला. राज्यातील मुलभूत व अत्यावश्यक सुविधांची तपासणी केल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आला आहे. आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यात येतात. आरोग्य विभागाच्या संचालकांनी (directors) जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा उद्दिष्टनिहाय केलेल्या कामाची आकडेवारी पाहून राज्य शासनातर्फे (State Govt) राज्यातील अत्यावश्यक व मुलभूत सुविधांची तपासणी वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यांकन यामध्ये करण्यात येते. आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या बाबींवर कार्य केले जाते.
– राज्यस्तरीय बैठकीमध्ये आयुक्त, संचालक आरोग्य सेवा, आरोग्य विभाग
– जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
३८ प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेल्या उद्दिष्टनिहाय आकडेवारीमध्ये जिल्हा परिषद वर्धा निकषामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व जिल्ह्यामधून चौथा तर नागपूर विभागातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पुणे (Pune) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आयुक्त, संचालक (Commissioner, Director) आरोग्य सेवा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांनी सर्व महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यात येत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यविभाग नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविते. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येते. मागील काही काळात विविध ठिकाणच्या आरोग्य सेवेत सुधारणा झाल्याचे निदर्शनास येते. आरोग्य सेवा सुधारताना राज्यात चौथा क्रमांक मिळाल्याने वर्धा जिल्ह्याला सन्मान मिळाला आहे.
■■ हे टीम वर्क आहे. यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आढावा घेत माहिती घेण्यात येते. सर्वांच्या योगदानाचे हे यश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांनी सांगितले.