पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्त्वास लागणार एक ते सव्वा वर्ष
योजनेच्या पूर्णत्त्वानंतर सुटणार कारंजाच पाणी प्रश्न
वर्धा (Wardha) :- कारंजा घाडगे कारंजा शहरासोबतच तालुक्यात विविध गावांत पाणी टंचाई निर्माण होते. शहरातही दरवेळी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. येथील पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्त्वास (completion of the scheme) एक ते सव्वा वर्ष लागण्याची शक्यता आहे. योजनेच्या पूर्णत्त्वानंतर ( After completion) कारंजाचा पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- कारंजा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या असल्याने ग्रामीण भागामध्ये नारा २२ योजनेच्या (of Nara 22 scheme) माध्यमातून कार नदी प्रकल्पावरून दररोज योजनेच्या द्वारे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. शहरातही पाणी समस्या गंभीर झाली. गेल्या कित्येक वर्षापासून शहरात पाणीपुरवठा सहा ते सात दिवसानंतर नळाद्वारे होत आहे. या समस्येकडे सत्ताधारी त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी सुद्धा आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. कारंजा नगरपंचायत मध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पाणीपुरवठा योजनेसाठी पत्रव्यवहार सुरू होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) कोसळल्यामुळे आणि कारंजा नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता अस्तित्वात असल्यामुळे पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात होती. निधी मिळत नसल्याने समस्या निर्माण झाल्या आणि पाणी समस्या कधी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर नगरपंचायतमध्ये मोठी उलटफेर झाली. काँग्रेसच्या नगराध्यक्षासह (With Mayor of Congress) संपूर्ण नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्र्याच्या ( Chief Minister in Shiv Sena Shinde faction) हस्ते जाहीर प्रवेश केला.प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांनी कारंजा शहरातील जवळपास ३३ कोटीची पाणीपुरवठा योजनेकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष घातले. मुख्यमंत्र्यांनी लगेच कारंजा शहरासाठी ३३ कोटीची पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर
गाजावाजा न करता गेल्या चार महिन्यापासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चालू
केली. कारंजा नगरपंचायतने काही गाजावाजा न करता गेल्या चार महिन्यापासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चालू करून प्रगतीपथावर आहे. टाकीचे बांधकाम असो की पाईपलाईन टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कारंजा शहरातील गेल्या कित्येक वर्षापासूनच पाण्याची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसून येते.
■ कारंजा शहरासाठी गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रश्न
या पाणी समस्येमुळे अनेक कुटुंब उन्हाळ्यामध्ये मोठ्या शहरांमध्ये जायचे. कारण टँकरने सुद्धा पाणी मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे कारंजा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर हे नगरपंचायत समोर मोठे आव्हान होते. मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister) कारंजा शहरासाठी ३३ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि नगरपंचायतने नळ योजनेच्या कामाला गेल्या चार महिन्यापासून सुरुवात केली आहे. जवळपास २० टक्के काम झालेले आहे. यामध्ये टाकी बांधकाम पाईपलाईन टाकने काम प्रगतीपथावर आहे. शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी एक ते सव्वा वर्ष लागू शकते.