छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी
वर्धा (Wardha) : राष्ट्रवादी कॉंग्रेस (Congress) पक्ष व महायुतीने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रीमंडळात स्थान द्यावे, या मागणीसाठी महात्मा फुले समता परीषद, विविध ओबीसी संघटना (OBC Association) आणि भुजबळ समर्थकांनी वर्धा महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, ओबीसींचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ऐन वेळेवर महाराष्ट्र मंत्रीमंडळात (Maharashtra Cabinet) प्रवेश नाकारून, ओबीसी समाजाशी विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ओबीसींच्या विविध हितकारी योजना आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व ईतर योजना बंद करण्याचे हे सुनियोजित षडयंत्र असुन, ओबीसींचे आरक्षणात (OBC Reservation) घुसखोरी करणाऱ्यांना पाठींबा देवून, ओबीसींचे आरक्षणच रद्द करण्याचे हे षडयंत्र आहे, अशी ओबीसी असुरक्षततेची भावना निर्माण झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
भुजबळांवर व पर्यायाने ओबीसींवर त्यांचा आवाज दडपुन अन्याय करण्याचा प्रयत्न झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व महायुतीवर (Grand Alliance) ओबीसींच्या विश्वासघाताचा ठपका ठेवुन, ओबीसी समाज महायुतीपासुन दुर होईल असा ईशाराही देण्यात आला आहे. निदर्शने करताना महात्मा फुले समता परीषदेचे (Mahatma Phule Samata Parishad) राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, कार्याध्यक्ष विशाल हजारे, उपाध्यक्ष अमोल ठाकरे, निळकंठ राऊत, महिला जिल्हा अध्यक्ष कविता मुंगळे, विद्या बहेकार, किरण कडु, निलिमा घाटे, केशव तितरे, माधवी देशमुख, साधना आंबुलकर, अनुप वाढोणकर, बंटी खडसे, अविनाश गमे, प्रथमेश हांडे, रोहीत ताजने, भैरवी पेटकर, प्रविण राऊत, ओंकार ठाकरे, प्रदिप कडु, शिला वैद्य, दिनेश बोबडे, ज्योती मांढरे, वृशाली कदम, संध्या वैद्य, विद्या येलेकर, संदिप लिचडे, वृषाली कदम, सुधीर वानखेडे, शिल्पा वैद्य, उषा कावडे, समता परिषदेचे कार्यकर्ते ओबीसी संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.