वर्धा (Wardha) :- सेलू तालुक्यातील देऊळगाव येथील नलुबाई हिरालाल कुलचणे यांच्या घराला अचानक रात्री आठ वाजताच्या सुमारास आग(Fire) लागून घराचे छत व घरामध्ये ठेऊन असलेल्या जीवनाशक वस्तू यामध्ये गादि, दुलई, खुर्च्या, कुलर, अंगावर घालायचे संपूर्ण कपडे यामध्ये जळाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घराच्या साईडला दुचाकी ठेवलेली होती, रात्री आठच्या सुमारास आग लागल्याने आगीचे लोळ गावातील काही नागरिकांना दिसले त्यांनी आरडाओरडा केला, त्यामुळे गावातील नागरिकांनी घराची आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही
या आगीमध्ये जीवनाशक संपूर्ण वस्तू जळाल्या असून यामध्ये कुलचने यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील माझी जि. प सदस्य बालेश मोरवाल माजी सरपंच अश्वजीत चाटे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. जीवनाशक वस्तू सगळ्या जळाल्याने नलू कुलचने यांच्यावर पहाड कोसळला असून त्यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.