जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना
हिंगोली (Warehouse and machinery) : जिल्ह्यातील मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीची चालू झालेली वेअर हाऊस व मशिनरी शेडची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील कृषि विभागाच्या विविध यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ‘आत्मा’चे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीस ‘आत्मा’चे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक राजेंद्र कदम, नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ जी. एच. कच्छवे व इतर यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.