हिंगोली (hingoli):- जिल्ह्यातून संत गजानन महाराज यांची पालखी जात असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या(Department of Health) घोषवाक्य प्रमाणे ‘आरोग्याची वारी ! पंढरीच्या दारी !!’ नुसार पालखीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा तप्तर देण्यासाठी पालखी मार्गावर आरोग्य दूत, मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथक, स्त्रीरोग तज्ज्ञ(Gynecologist), हिरकणी कक्ष, 102, 108 रुग्णवाहिका सोबत राहणार आहे. कोणताही साथरोग उद्भवणार नाही, याची खास दक्षता घेण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
जिल्ह्यात संत गजानन महाराज पालखी ही दिनांक 23 जुलै रोजी दुपारी पानकनेरगाव येथे तर रात्री सेनगाव येथे मुक्काम, दुसऱ्या दिवशी 24 जुलै रोजी दुपारी नर्सी नामदेव महाराज संस्थान येथे तर रात्री डिग्रस कऱ्हाले येथे मुक्कामी आणि तिसऱ्या दिवशी 25 जुलै 2024 रोजी दुपारी औंढा नागनाथ येथे तर रात्री जवळा बाजार येथे मुक्कामी राहणार असून, पुढे प्रस्थान करत आडगाव रंजेबुवा येथे व दुपारनंतर परभणीकडे रवाना होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, ओटी टेस्ट, पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. यासाठी 21 आरोग्य दूत, 6 आरोग्य पथक, 3 हिरकणी कक्ष, वैद्यकीय अधिकारी(Medical Officer), समुदाय आरोग्य अधिकारी, नर्स व इतर तांत्रिक कर्मचारी असे एकूण 53 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
सेनगाव येथे 127 वारकऱ्यांवर किरकोळ उपचार
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या 800 वारकऱ्यांना आरोग्य पथक उत्तम आरोग्य सेवा देत आहेत. सेनगाव येथे किरकोळ आजारी असलेल्या 127 वारकऱ्यांना उपचार देण्यात आला. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची खात्री आरोग्य पथकामार्फत करण्यात आली. तसेच पाच आयसीयू बेड, ईसीजीसह अत्यावश्यक सेवा, स्त्रीरोग तज्ज्ञ, दोन आरोग्य पथक, आरोग्य दूत यांची निर्मिती करण्यात आली होती. येथील आरोग्य पथकाची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल व ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील कर्मचारी स्टाफ व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा येथील कर्मचारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नर्सी नामदेव येथे वाकऱ्यांची तपासणी
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव महाराज संस्थान येथे झाले असता पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांची तपासणी आरोग्य (Check health) पथकामार्फत करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी येथील आरोग्य पथकाला भेट देऊन पाहणी केली. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश खुडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.