कोरची (Bedgaon Health problems) : डॉ. शिलू चिमुरकर यांच्या जनसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बेडगावला दिलेल्या भेटीत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यालयामध्ये मीटिंग घेतली. यावेळी सरपंच चेतन किरसान आणि गावकऱ्यांनी आरोग्यविषयक गंभीर समस्या (Health problems) मांडल्या, ज्या ऐकून काँग्रेस कार्यकर्त्या डॉ. चिमुरकर यांनी या समस्यांचे समाधान करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
बेडगाव परिसरातील आरोग्य सेवा (Health problems) अत्यंत दुर्गम आहेत. बोटेकसा येथील प्राथमिक चिकित्सा केंद्र बेडगावपासून 16 किलोमीटर अंतरावर असून रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असल्याने गावकऱ्यांना या केंद्रापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच, बोटेकसा केंद्रावरून उपचारासाठी रुग्णांना कोरची आणि पुढे गडचिरोली येथे रेफर केले जाते. या कारणामुळे, गावातील लोकांना वेळ आणि पैशांचा अपव्यय सहन करावा लागत आहे. सोबतच हा जीवघेणा प्रवास करत असताना रस्त्यातच माता मृत्यू आणि बाल मृत्यू होत आहेत. ही गंभीर समस्या आहे.
या (Health problems) समस्येच्या निराकरणासाठी यापूर्वी बेडगाव आणि आसपासच्या 10 ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन “बेडगाव येथे प्राथमिक चिकित्सा केंद्र स्थापन करावे” असा ठराव मंजूर करून जिल्हा परिषदेला पाठविला आहे. मात्र, आजपर्यंत या मागणीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
यावेळी बेडगाव ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat) सरपंच चेतन किरसान, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकट वाळदे, मासेमारी संघटनेचे जिल्हा डायरेक्टर लक्ष्मण सरपा, ग्रामपंचायत सदस्य लीलाताई ताडामी, पोलीस पाटील माधुरी गड्डेपार, जयदेव कोरटे , दिनेश बोगा, केशव लेनगुरे, काशिनाथ सहारे, महेश आमले, आशीष नगारे , मोहन धानगाये यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि स्थानिक नेते उपस्थित होते. डॉ. शिलू चिमुरकर यांनी या समस्यांचे त्वरित निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
डॉ. चिमुरकर यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर गावकऱ्यांमध्ये नागरिक आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पुढील लढ्याची तयारी करत आहेत. डॉ . चिमुकर यांच्या जनसंवाद यात्रेमुळे कोराचीतील गावागावांमध्ये काँग्रेस विषयी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून होत आहे.