कारचा टायर फुटल्याने अपघात
कारंजा (washim) :- समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarga) लोकेशन 160 वरआज 8 मे रोजी दुपारी साडे 3 वाजताच्या दरम्यान कारचा टायर फुटल्याने अपघात घडला.
अपघातात दोन महिला गंभीर जखमी
या अपघातात दोन महिला गंभीर जखमी (seriously injured) झाल्या. तर दोन जण किरकोळ जखमी (Minor injuries) झाले. श्रद्धा आशिष शर्मा वय 28 वर्ष रा.मुंबई (Mumbai) ठाणे व संगीता मुरलीधर शर्मा वय 60 वर्ष रा. तिरोरा जिल्हा गोंदिया अशी जखमी महिलांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील तीरोरा येथून 5 जण कार ने शिर्डी कडे जात असताना मार्गातील लोकेशन 160 वर कारचा टायर फुटला. त्यामुळे कार सुरक्षा कठड्याला धडकल्याने हा अपघात घडला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका(Ambulance) चालक विधाता चव्हाण व डॉ. भास्कर राठोड यांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले तर किरकोळ जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.