कारंजा (Washim Accident) : गत महिनाभरात कारंजा तालुक्यात 24 अपघाताच्या घटना (Washim Accident) घडल्या आहेत. त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर 42 जण गंभीररित्या जखमी झाले. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने अपघाताचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 22 एप्रिल ते 3 मे यादरम्यान कारंजा तालुक्यात 24 ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात झाले.
7 जणांनी गमावला जीव तर 42 जण जखमी
नागपूर संभाजीनगर दृतगती महामार्ग, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग यासह इतर रस्त्यावर या अपघाताच्या घटना घडल्या. 22 एप्रिलला नागपूर संभाजीनगर महामार्गावरील रामराज्य सिनेमागृहाजवळ अपघाताची (Washim Accident) घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला. 23 एप्रिलला पहाटे साडेसहा वाजता कारंजा मंगरूळपीर मार्गावरील चकवा फाट्याजवळ अपघात झाल्याने एक 27 वर्षीय युवक गंभीररित्या जखमी झाला.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
25 एप्रिलला रात्री साडे 9 वाजता कारंजा मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा या गावाजवळ दुचाकीचा अपघात (Washim Accident) झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. 26 एप्रिलला कारंजा मानोरा मार्गावरील (Manora road) अडाण नदी पुलावर अपघात झाले.