उमरी खुर्द (Washim Accident): मानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या उमरी खुर्द येथील युवराज आडे (वय 35 ), त्याची आई नबरीबाई आडे( वय 55) व बहीण वीणाबाई चव्हाण (वय40) हे तिघे जण आज मोटारसायकलने नातेवाईकांकडे जात होते. दरम्यान, दारव्हा-यवतमाळ मार्गावरील शेलोडी गावाजवळ त्यांची दुचाकी व चारचाकी वाहन यांच्यात जबर अपघात (Washim Accident) झाला.
कुटुंबातील एकुलता एक कमावता मुलगा ठार
हा (Washim Accident) अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये युवराज आडे हा जागीच ठार झाला आहे. तर आई नबरीबाई व वीणाबाई या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर दोन्ही जखमींना उपचारार्थ यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात (yavatmal Hospital) हलविण्यात आले आहे. कुटुंबातील एकुलता एक कमावता मुलगा या अपघातात दगावल्याने गावात शोककळा पसरली आहे.