पीकअप वाहनाच्या धडकेत एक ठार
कारंजा (Washim):- पीकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २० एप्रिल रोजी ग्राम गिर्डा येथे घडली होती. याप्रकरणी १५ दिवसानंतर दाखल झालेल्या फिर्यादीवरून ५ मे रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव माणिक महादेव शिंदे (४५, रा. रुद्राळा) असे असून, त्याच्या दुचाकीला (एमएच ३७ सी ६६५६ ) क्रमाकांच्या मानोराकडून येणार्या पिकअप वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात धडक (strike) दिली होती. या घटनेत ते गंभीर जखमी (seriously injured) होऊन नंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गणेश वसंतराव शिंदे (३२, रा.रुद्राळा) यांच्या फिर्यादीवरून पीकअप वाहनाच्या चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.