शेलुबाजार/ वाशिम (Washim Accident) : समृद्धी महामार्ग इंटरचेंज (Samruddhi Highway) परिसरात शेलुबाजार ते अकोला रोडवरील वळणावर एसटी बस व बुलेटचा अपघात होऊन या घटनेत एक जण जागीच ठार (Washim Accident) झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, शेलूबाजारवरून वाशिम आगाराची बस क्रमांक एम.एच.४० एन ८९५८ ही वाशिम-अकोला बस अकोल्याकडे जात असतांना याच दिशेने जात असलेल्या बुलेटचा अपघात (Washim Accident) झाला. यामध्ये दुचाकीस्वार अनुप संजय मानतकर वय अंदाजे ३८ रा. भेंडी (महाल) ता. बार्शीटाकळी जि. अकोला यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतक अनुप हा बार्शीटाकळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील मानतकर यांचा पुतण्या व बार्शीटाकळी पं. स. सभापती सौ. सुनंदा मानतकर यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. अपघाताची (Washim Accident) माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) आपत्कालीन पथक, अॅम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परंतु अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी (Washim Police) पोलिसांनी दाखल होत पुढील कार्यवाही केली.