कारंजा(Washim) :- आरोपींनी संगनमत करून फिर्यादीवर लोखंडी रॉड (Iron rod) व दगडाने प्राणघातक हल्ला केला. खतनापूर शेतशिवारात घडलेल्या या घटनेत १२ जणांवर १ ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (Police Station)गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खतनापूर शेतशिवारातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , २६ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास फिर्यादी हा शेतात काम करत होता. यावेळी आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून काही कारण नसताना फिर्यादीस लोखंडी रॉड व दगडाने मारुन जखमी केले. या प्रकरणी रज्जाक लल्लु गारवे (४४, रा. गवळीपुरा कारंजा ) यांच्या फिर्यादीवरून सलीम नंदा गारवे, सोहेल सलीम गारवे, उस्मान नंदा गारवे, ईस्माइल नंदा गारवे, मेहबुब चांद गारवे, फिरोज चांद गारवे, रन्नु चांद गारवे, रहीम चांद गारवे, शमीना सलीम गारवे, जैतुन उस्मान गारवे, रुख्सार इस्माईल गारवे व जैतुन नंदा गारवे, ( सर्व रा. गवळीपुरा कारंजा ) यांच्याविरुद्ध कलम ११८(१), १८९ (२), १८९ (४), १९१ (१), १९१(२) १९१ (३) , १९० बि.एन.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दोन गटांत मोठी हाणामारी
घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण करीत आहे. दरम्यान, शेतरस्त्याच्या कारणावरून २६ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या स्थानिक गवळीपुरा येथे दोन गटांत मोठी हाणामारी झाली होती. दोन्ही गटाकडून तक्रारी करण्यात आल्याने ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र त्यातीलच एका गटाकडून खतनापूर शेतशिवारात घडलेल्या राड्याची तक्रार विलंबाने ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे. त्यामुळे १२ जणांवर ग्रामीण पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी रॉड व दगडाने प्राणघातक हल्ला