कारंजा(Washim):- कारंजा शहरातील यशोदा नगरातील दोन घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (burglary) करून 72 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. ही घटना 18 मे च्या सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरातील नागरिकात भीतीचे(fear) वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार (Complain to the police) दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल(Crimes filed) केले आहे.
पत्नी व मुलाबाळासह अकोला येथे सासरवाडीला गेले असता घरफोडी
यशोदा नगरात भाड्याने राहत असलेले शिक्षक सचिन तुळशीराम पाटील हे शाळेला सुट्टी असल्याने 6 मे रोजी पत्नी व मुलाबाळासह अकोला (Akola)येथे सासरवाडीला गेले होते . या संधीचा फायदा साधून अज्ञात चोरट्यांनी ते भाड्याने राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश मिळविला आणि त्यांच्या घरातील कपाटातील 38 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यात 4 हजार रुपये किमतीचे 4 चांदीचे चाळ , 2 हजार रुपये किमतीचा चांदीचा करंडा व चांदीचा गुच्छा, 5 ग्रॅम वजनाची 31 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व रोख 1 हजार रुपयांचा समावेश आहे. तर मनोज अरुणराव खडसे यांच्या घरातून सुद्धा अज्ञात चोरट्यांनी 34 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. सचिन तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा. द .वी.च्या कलम 457 व 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे.