कारंजा(Washim) :- पत्नी मुलाबाळांसह माहेरी गेल्याने पतीने दारूचे अतिप्रमाणात सेवन (intake) केले. यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निलेश हरिचंद्र झंझाड (४६, रा.नूतन कॉलनी कारंजा) असे मृतकाचे नाव आहे.
दारूच्या व्यसनाची सवय
निलेश झंझाड यांना दारूच्या(Alcohol) व्यसनाची सवय होती. त्याच्या सततच्या या सवयीमुळे वैतागून पत्नी मुलाबाळांसह माहेरी निघून गेली. मात्र, त्यांचे दारू सेवनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी अधिक वाढले. अशात २५ ऑगस्ट रोजी त्यांचा नूतन कॉलनीतील राहत्या घरी मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी सुनील नामदेव झंझाड ( ४६, रा.धोत्रा देशमुख) यांच्या फिर्यादीवरून कलम १९४ बीएनएसनुसार मर्ग दाखल केला आहे.