कारंजा (Washim):- यवतमाळ वाशिम लोकसभा (Washim Lok Sabha)निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा प्रचार करीत असताना अज्ञात व्यक्तीने समाज माध्यमावर खोटी अफवा पसरवून बदनामीकारक मजकूर लिहून खोटी अफवा पसरविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(NCP Sharad Pawar) गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव नाईक यांनी तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे.
समाज माध्यमावर खोटा संदेश पसरविल्याप्रकरणी तक्रार
पोलिसांच्या मदतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची (Election Commission of India) अधिकृत वेबसाईट सक्षम अॅपवर दाखल करण्यात आलेल्या ऑनलाईन तक्रारीत बदनामी करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी डॉ. श्याम जाधव नाईक यांनी केली आहे. त्यांनी मी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याने लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा निवडणूक काळात प्रचार केला . पण उमेदवारांच्या मतावर परिणाम होईल असे खोडकर वृत्त अज्ञात व्यक्तींनी समाज माध्यमावर खोटी अफवा पसरवत समाजात माझी बदनामी (Defamation)केली. त्यामुळे माझी मानसिक स्थिती व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असे तक्रारीत नमूद केले आहे.