आ. झनकांच्या नेतृत्वात छेडले आंदोलन
वाशिम (Washim Congress) : भाजपा खा. अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुराग ठाकुर यांच्या वक्तव्याचा निषेध करुन आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. लोकसभेत ज्यावेळी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला .तेंव्हा खा. अनुराग ठाकूर यांनी खा.राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जात विचारणे या बाबीचा देशभरातील जनतेत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ.अमित सुभाषराव झनक यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने केली. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव दिलीपराव सरनाईक ,प्रदेश सरचिटणीस दिलीप भोजराज, जि.प शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, माजी अध्यक्ष उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे , जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक, जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती तथा प्रदेश प्रतिनिधी किसनराव म्हस्के, महादेव सोळंके , संदीप घुगे, शहराध्यक्ष शंकर वानखेडे योगेश बळी, चंद्रकांत साठे, मधुकरराव जुमडे, सरचिटणीस जगदीश बळी, ज्ञानदेव गायकवाड, अख्त्तर खान पठाण ,वाशिम पं. स. उपसभापती गजानन गोटे, ईफ्त्तखार पटेल, गणेश वानखेडे, गणेश गायकवाड ,इम्रान इमाम परसुवाले ,मनोज रामेश्वर गोरे, कैलास पाठक, भगवानराव देवडे ,अमोल विजयराव नानोटे, अनिल इंगोले, गणेश टेकाळे ,गणेश सदार, राजू खांबलकर, इंजिनीयर संदीप खराटे, भारत गुडदे, गजानन शिंदे ,स्वप्निल तायडे, उत्तम सुरोशे, दिलीप चव्हाण, कैलास थोरात , आजाबराव सरनाईक, डॉ.विशाल सोमटकर, सागर गोरे ,सुभाष देवहंस, समाधान माने, कैलास थोरात, किशोरआप्पा पेंढारकर ,सुनील मापारी ,संजय भुरभुरे ,नारायण ईडोळे ,अमोल शिंदे, अमोल नरवाडे ,प्रकाश वायभासे, सुनंदाताई गणोजे, नंदाताई तायडे ,वा.भ तायडे, विश्वनाथ आरू, संतोष खराटे, लक्ष्मण जाधव ,शिवाजी बकाल, सभापती मधुकर काळे, शशिकांत टनमने ,योगेश बळी यांचेसह हजारो कार्यकर्त्याची उपस्थिती होती.