कारंजा (Karanja Police): दाखल फिर्यादीनुसार कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी (Karanja Police) कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले (Karanja Police) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदास चव्हाण आणि शिपाई निलेश थेर हे दोघेजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे 8 मे रोजी प्रत्यक्ष कार्यवाहीदरम्यान ही बाब निष्पन्न झाली. त्यावरून (ACB action) ‘एसीबी’ ने दोघांवरही शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.
कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
मात्र, त्यांना याची कुणकुण लागतात दोघेही फरार झाले. तक्रारदाराचा त्याच्या शेतालगत असलेल्या एका शेतकऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, (Karanja Police) सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवदास चव्हाण आणि शिपाई निलेश थेर या दोघांनी तक्रारदारास त्याच्या तक्रारीची दखल घेवून आरोपिवर कारवाई करणे आणि त्यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीची दखल न घेण्यासाठी त्यांना 20 हजार रुपयांची मागणी केली. (ACB action) गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोघेही फरार झाले. त्यांच्या शोधात पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.