वाशिम (Washim crime) : तालुक्यातील एका लहानशा गावातील मागासवर्गीय युवतीला तिच्या ईच्छेविरुध्द पळवून नेवून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगीक अत्यााचार (Sexual abuse girl) केले. एवढेच नाहीतर तिला व तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडितेने येथील (Washim Police) ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी सोहेल खान युनूस खान रा. पोपटखेड ता. आकोट जि. अकोला व इतर दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर (forced abduction) प्रकरणाला लव्ह जिहादची किनार असल्याचे समजते.
जबरीने पळवून मुलीचे लैंगिक शोषण
याबाबत पिडीत मुलीने (Washim Police) वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ती वाशीम तालुक्यातील एका लहानशा गावात राहते व घरकाम करते. सन २०२१ मध्ये आरोपी सोहेल खान युनूस खान रा. पोपटखेडा ता. आकोट जि. अकोला याने सोशल मीडियावरुन माझा मोबाईल नंबर मिळवून माझ्यासोबत संपर्क करण्यास सुरूवात केली. सदर आरोपी नेहमी माझ्याशी फोनवर संपर्क साधत होता. यादरम्यान माझे लग्न झाले. परंतु, काही दिवसातच माझी फारकत झाली. तेव्हापासून मी आई -वडिलांकडे रहायला आली. ही बाब आरोपी सोहेल शेख युनूस शेख याला माहिती पडली. तेव्हा त्याने पुन्हा माझ्याशी वारंवार संपर्क करुन लग्नाचा तगादा लावला.
प्रकरणाला लव्ह जिहादची किनार असल्याचा आरोप
दरम्यान, २ मे रोजी रात्री १२ वाजता साहेल हा थेट चारचाकी वाहनाने माझ्या गावी आला. माझ्याशी फोनद्वारे संपर्क करुन मला घराबाहेर बोलाविले. यावेळी चारचाकी वाहनात सोहेल याच्यासह व अन्य दोन जण अनोळखी व्यक्ती होते. मी त्या चारचाकी वाहनाजवळ गेले असता, सोहेलने मला पाणी पिण्याकरीता दिले. पाणी पिल्यानंतर मला धुंदी आली व अस्वस्थ वाटत होते. याच संधीचा फायदा घेत सोहेल व त्याच्या Sexual abuse girl) मित्रांनी मला जबरदस्तीने (forced abduction) चारचाकी वाहनात बसवून अमरावती येथे नेले. ३ मे रोजी सकाळी १० वाजता दरम्यान त्याने मला तू मुस्लीम धर्म स्वीकार करुन माझेसोबत लग्न कर अन्यथा तुझ्या आई-वडिलांना जीवे मारुन टाकील, अशी धमकी दिली.
जीवे मारण्याची धमकी देवून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न
मात्र, मी मुस्लीम धर्म स्वीकारण्यास व बुरखा घालण्यास नकार दिला. परंतु, आई वडिलांच्या जीवाला धोका असल्याचे पाहून मी सोहेलसोबत ४ मे ते ९ मेपर्यंत एका खोलीत एकत्र राहिलो. या दरम्यान सोहेलने मला मारहाण करुन धमकावून माझे इच्छेविरुद्ध (forced abduction) जबरदस्तीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले, अशा आशयाची फिर्याद पिडीत मुलीने (Washim Police) वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनला दिल्यावरुन आरोपी सोहेल शेख युनूस शेख, रा. पोपटखेडा व दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३६६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या (Washim Police) प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदिश बांगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक अनिता इंगळे या करीत आहेत. या Sexual abuse girl) प्रकरणाला लव्ह जिहादची किनार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.