महिलेस चौघांकडून मारहाण
मानोरा (Washim) :- मानोरा पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत असलेल्या तळप बु येथील नर्मदाबाई प्रल्हाद राठोड (वय ६५ वर्ष) यांना ५ मे रोजी चौघांनी मारहाण (beating) करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी विक्या सिताराम राठोड, अमर सिताराम राठोड, उज्वलाबाई राठोड व अमरची पत्नी यांनी रविवारी ३ वाजताच्या सुमारास “नर्मदाबाई राठोड हिला तुझा नवरा कुठे आहे, त्याने माझ्या आईला मारहाण केली आहे. त्याला आम्ही सोडणार नाही..”असा वाद घालून मारहाण करत शिवीगाळ केली व हातपाय तोडण्याची धमकी (threat) दिली. नर्मदाबाईच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल(Filed a case) केला आहे. पूढील तपास मानोरा पोलिस करीत आहेत.