मंगरूळपीर/ वाशिम (Washim Death) : तालुक्यातील दस्तापुर येथील धरणात चार मित्र पोहण्यासाठी गेले असता, (Washim Death) मंगरूळपीर शहरातील चहेलपुरा भागातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, १७ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
दस्तापुर येथील घटना
प्राप्त माहितीनुसार, येथील दर्गा चौकातील चार मित्र पोहण्यासाठी दस्तापुर येथील धरणावर गेले असता, मोहम्मद शेख हुसेफ वय 18 वर्ष हा धरणात पोहत असताना वर आलाच नाही. मोहम्मद शेख हूशेफ डुबल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी नातेवाईकांना कळविले. (Washim Death) घटनेनंतर आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार, मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर , दस्तापुरचे सरपंच मुकेश मुंजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संत गाडगेबाबा आपत्कालीनचे दीपक सदाफळे यांच्या टीमने साडेपाच वाजेपर्यंत तरुणाचा शोध घेतला. अखेर साडेपाच वाजताच्या दरम्यान तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतदेह शवच्छेदनासाठी मंगरूळपीर (Washim Hospital) शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.