वाशिम (Washim):- मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द येथे दोन दिवसापासून रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain with strong winds)पडल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहे.
उन्हाळी बाजरी व ज्यारी सह कांदे आणि विट भटी चे खुप नुकसान
बरेच शेतकरी या वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पीक बाजरी(millets), ज्वारी (sorghum) आणि कांदे (onions) लावलेले आहेत. काही शेतकरी वर्ग पीक काढणी केली तर बरेच शेतकरी यांनी पीक काढणी केलेली नाहीं. मागे पुढे लागवड असल्याने आता तोंडावरील बाजरी ज्वारी शेतातील पिके वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने जमिनीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी पहायला मिळत आहे. तसेच बरेच लोकांचे कांदे घरी आणले आहे तर काही शेतकऱ्यांचे कांदे शेतात निबांच्या झाडाखाली ठेवलेले आहे. त्यांचे कांदे सुद्धा खराब झालेले आहे. विट भटी मालकांचे सुद्धा विट खराब झालेली आहे. एकंदरी उमरी खुर्द परीसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान (financial loss) झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करावे अशी शेतकऱ्यांची मागणी
मानोरा चे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी या भागाची तातडीने पाहणी करून कृषी अधिकारी व तलाठी मार्फत सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केली आहे.