मानोरा(Washim):- तालुक्यातील गादेगाव, वाईगौळ व सावळी या शेत शिवारातून वर्धा नांदेड या रेल्वे मार्ग जात असुन मागील तीन वर्षापासुन काम सुरु आहे. दिग्रस ते मानोरा रोडवरील बोगद्याच्या खोदकामास (Engraving) सुरुवात झाली आहे, तर रत्यावरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली आहे.
रेल्वे मार्गाचे भूमिपूजन रेल्वे मंत्र्याच्या यांच्या हस्ते पार पडले
नागपूर व नांदेड या दोन महत्त्वाच्या बाजारपेठेला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव (Railway Minister Lalu Prasad Yadav) यांच्या हस्ते पार पडले होते. केंद्रातील आघाडी शासनाच्या काळात या रेल्वे मार्गावर पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम रखडले होते मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाच्या प्रधानमंत्री पदी आरूढ झाले तेव्हापासून या रेल्वे प्रकल्पावर केंद्र शासनाने (Central Govt) निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली असून आज वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे चे काम पुर्ण झाले. असून कळंब पासून यवतमाळ, दारव्हा, दिग्रस ते ईसापुर – पुसद पर्यंत भराव्याचे व पुलाचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे.
दिग्रस ते मानोरा मार्गाखालून रेल्वे जाणार असल्यामुळे बोगद्याच्या खोदकामास सुरुवात झाली असून या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. सन २०२७ पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण होऊन इसापूर पर्यंत रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे