कारंजा (Washim):- स्थानिक कान्नव जीन परिसरात लाभलेल्या भीषण आगीत (terrible fire) एका गोदामासमोरील खुल्या जागेत ठेवलेले सुमारे दोन लाख रुपयांचे शेतीपयोगी प्लास्टिक पाईप जळून खाक झाले. ही घटना १ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
गोदामासमोरील खुल्या जागेत ठेवलेल्या प्लास्टिक पाईपला अचानक आग
प्राप्त माहितीनुसार, शोएब गफार अन्सारी यांचे स्थानिक भगतसिंग चौकात हार्डवेअरचे (hardware)दुकान असून, कान्नव जीन परिसरात गोदाम आहे. ज्यामध्ये लाखो रुपयांचे शेतीपयोगी व अन्य साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या गोदामासमोरील खुल्या जागेत ठेवलेल्या प्लास्टिक पाईपला अचानक आग लागली. या आगीत विविध आकाराचे ११०० ते १२०० फूट लांबीचे एचडीपीई पाईप (HDPE pipe)जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकरी दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनात नगर परिषद अग्निशमन दलाचे (fire brigade) अधिकारी बाथम, चालक संजय रेवाळे, फायरमन आमद खान, शुभम झोपाटे, सचिन बैस, सोनू खान, जायेद अली आदींनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे सुदैवाने मोठी आर्थिक हानी(Financial loss) टळली.