मानोरा(Washim) :- महाराष्ट्र शासनाने साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवून आणण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. यामध्ये देशातील ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा त्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कुठल्याही क्षेत्राचा समावेश त्याच्यात नसल्यामुळे बंजारा समाजाची काशी पोहरादेवी, गुरु मंदिर कारंजा (लाड) व शिरपूर जैन येथे असलेले जैन मंदिर (Jain temple)तसेच वाशिम येथे असलेले बालाजी मंदिराचा समावेश यामध्ये करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याजकडे ज्ञायक पाटणी यांनी भेट घेऊन केली.
विविध महत्त्वाचे मुद्दे मांडून केली चर्चा
वाशिम जिल्हयातील ग्रामीण भागातील मागास वस्तीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे व केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Govt)विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणे यासाठी ग्रंथालय व अभ्यासिकासह अद्यावत सोय सुविधा असणारे संविधान सभागृह सुरू करण्यास सरकारने शासनाने सकारात्मकता दर्शविली होती. त्यानुसार जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग (Department of Welfare) वाशिम यांच्याकडून सप्टेंबर २०२२ मध्ये ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ४७ संविधान सभागृह बनवण्याच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला होता. अद्यापही या प्रश्नावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वाशिम जिल्ह्यातील संविधानिक सभागृहाचे प्रस्ताव सामाजिक न्याय विभागात प्रलंबित असून तातडीने याबाबतीत कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याची मागणी देखील ना. फडणवीस याजकडे केली.
यास सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. यावेळेस कारंजा मानोरा मतदारसंघातील पांदण रस्ते, ओव्हरलोड डीपी, तांडावस्तींचा विकास, आदिवासी समाजासाठी ठक्करबप्पा योजना सारख्या विविध विकासात्मक बाबींबद्दल सुध्दा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती भाजपाचे ज्ञायक पाटणी यांनी दिली.