रिसोड (Washim) :- रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) 33 अंतर्गत 85 वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या व 40 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग, अशा एकूण 6 हजार 442 मतदारांना घरूनच मतदानाला ता. 08 नोव्हेंबर पासुन प्रारंभ झाला असुन यापैकी फक्त 543 मतदारांनी नमुना ड भरलेला आहे. ही मतदान प्रक्रिया 8 ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती निवडणूक प्रतक्रिये कडुन माहिती प्राप्त झालेली आहे.
6 हजार 442 पैकी फक्त 543 मतदारांची भरला नमुना ‘ड
रिसोड-मालेगांव विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहायक निडणुक अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात निवडणूक विभागाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध मतदारांना आणि 40 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना घरूनच टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघा मध्ये वरील प्रकारात 6 हजार 442 मतदार आहेत. यात 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 3608 तर हजार 2834 दिव्यांग मतदारांना समावेश आहे. परंतु या पैकी वरील प्रवर्गातील अवघ्या 543 मतदारांनी नमुना ‘ड’ भरल्याने दिव्यांग व 85 वर्षा पेक्षा जास्त वयातील मतदानाच्या टक्केवारी वर परीणाम होणार आसल्याची शक्यता आहे. या मतदारांना घरुनच मतदान करण्यासाठी त्यांना आज ता. 08 ते 10 नोव्हेंबर पर्यंत मतदान प्रक्रियेचा आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवाहन
भारत निवडणुक आयोगाने दिव्यांग नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे.08 नोव्हेंबर पासुन थेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे.त्यासाठी बिएलओ आपल्यापर्यंत पोहोचतील.त्यांना प्रतिसाद द्यावा व या प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन निवडणूक साहाय्यक अधिकारी प्रतिक्षा तेजनकर यांनी केले आहे.