मानोरा(Washim):- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असुन उमेदवारी मिळविण्याकरिता इच्छुक भावी आमदाराकडून जोरदार मोर्चबांधणी सुरू आहे. त्यात भाजपा, शरद पवार (sharad Pawar)राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)पक्षात तर जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यात काही उमेदवार सातत्याने जनसंपर्क ठेवून आहेत तर काही मात्र अर्ज भरण्यापुरतेच मर्यादीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदार संघात उमेदवारीकरीता स्पर्धा
मागील दहा वर्षांपासून दोन वेळा कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. भाजपाकडून सुरुवातीपासून दोन टप उमेदवार तिकीट मागत होते. मात्र अचानक आता दोन दिवसापासून गृह राज्यमंत्री राहिलेल्या उमेदवाराने बॅनर पोस्टर पूर्ण मतदार संघात तिकीट मागणीसाठी उडी घेतल्याने तीन दमदार उमेदवार पक्षाकडे तिकीट साठी प्रयत्न करत आहेत. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेना गटाच्या उमेदवाराला विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडे राजकारणात अनेक जण प्रवेश घेण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. तुतारी पेक्षा उबाठा शिवसेनाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी कमी दिसत आहे. कारंजा – मानोरा मतदार संघावर भाजपा व शरद पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून दावा करण्यात येत आहे. महायुतीचे भाजपा वगळता कोणत्या जागा कोणत्या पक्षाला सुटणार अद्याप याबाबत स्पष्टता झालेली नाही. असे असले तरी इच्छुकांची मात्र रांगच लागल्याचे चित्र आहे.
शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी लागल्या रांगा
यातच इच्छूक भावी आमदार त्यांच्या उमेदवारीकरीता वातावरण निर्मिती करीत आहेत. भाजपाचे इच्छूक आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) तर महाविकास आघाडीचे इच्छूक आमदार नाना पटोले, शरद पवार, उध्दव ठाकरे यांची मुंबई येथे वारी करून तिकिटासाठी भेट घेत आहेत.