कारंजा (Washim) :- राज्यातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार (violence against women) याविरोधात पुकारलेला ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay High Court) बेकायदा ठरवला. त्यामुळे कारंजात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बदलापूरसह इतर ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचाराविरोधात शनिवारी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध नोंदविला.
महिला अत्याचाराविरोधात शनिवारी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध नोंदविला
या विकृतीविरोधात खदखदत असलेला जनतेचा उद्रेक बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘बंद’चे आवाहन केले होते. ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आणि लेकीबाळींच्या संरक्षणासाठी होते. लोकभावना हीच लोकशाहीत सर्वोच्च असते आणि ती व्यक्त करण्याचा आणि त्यासाठी संसदीय आयुधे सनदशीर मार्गाने वापरण्याचा अधिकार जनतेला व राजकीय पक्षांना संविधानानेच दिला आहे. त्या अधिकारावरच जर निर्बंध येणार असतील तर ही कसली लोकशाही?” असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यानंतर त्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून काळ्याफिती लावून निषेध (Prohibition) नोंदविला. यावेळी डॉ.सुभाष राठोड, देवानंद पवार, गोपाल पाटील येवतकर, दिलीप रोकडे, ॲड. निलेश कानकिरड ,विजय देशमुख, दत्ता पाटील तुरक व गणेश ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आणि काँग्रेस (Congress)पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.