शेलुबाजार (Washim leopard) : नजीकच्या चोरद येथील शेतकरी संतोष गोर्ह्याच्या गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या गोर्ह्यावर (Leopard attack) बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष गोर्ह्याच्या शेतातील गोठ्यात ५ बैल ,१ गाय ,२ गोरे बांधलेले होते. गोर्ह्यानी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बैलांचे चारापाणी करुन घरी गेले. त्यानंतर बुधवारी सकाळी ७ वाजता गो’यात शेतात बैलांचा चारा पाणी करण्यासाठी गेले असता, गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर (Leopard attack) बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये गोर्हा जागीच ठार झाल्याचे दिसुन आले. घटनास्थळी बिबट्यासह त्याच्या बछड्याचे सुद्धा पायाचे ठसे स्पष्ट दिसत आहेत.
याबाबतची माहिती गोर्ह्यानी मानद वन्यजीव रक्षक इंगळे यांना दिली. गौरव कुमार इंगळे यांनी याबाबतची माहिती वनपरिक्षेञ अधिकारी कारंजा (लाड) यांना दिली. घटनास्थळी (Karanja forest) कारंजा वनपरिक्षेञ राऊंड ऑफिसर एस. के. सोनोने, वनरक्षक कुमारी सिमा शिंदे यांनी भेट दिली. गोर्ह्याचे शवविच्छेदन शेलुबाजारचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुसळे यांनी केले. यावेळी पंच प्रमोद चक्रनारायण बलवंतराव घुगे, चोरद येथील शेतकरी तेजराव घुगे, किसनराव गोऱ्हे, अनंता घुगे, दिलीपराव गोऱ्हे, अमोल कांबळे, देवानंद तायड़े यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. जनार्दन गोर्ह्याचे गट क्रमांक ७१ मध्ये ९ ऑगस्ट २०२३ मध्ये बिबटयाने १ निलगायवर हल्ला करुन जागीच ठार केले होते. या (Leopard attack) बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.