Risod:- रिसोड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात 25 जानेवारीला सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
25 जानेवारीला सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या तर प्रमुख उपस्थितामध्ये निवडणूक नायब तहसीलदार गजानन जवादे, निवडणूक लिपिक गजानन कांबळे, विष्णू टोंचर, राहुल कांबळे, केशव गरकळ, डी. एन.देशमुख, गंथाडे,स्वप्निल उखळकर, कुणाल वाघ, निलेश वाझुळकर, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बोडके यांनी केले.सर्वप्रथम मान्यवरांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदानाचे काय महत्त्व आहे यामागील पार्श्वभूमी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण करताना रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले की मतदान वाढविण्यासाठी नागरिकांसह युवकांनी समाजात जनजागृती करून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सकारात्मक असले पाहिजे.
आजचा युवक हा उज्वल भविष्याचा आधारस्तंभ
नव मतदारांनी मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदान यादीत नाव समाविष्ट केले पाहिजे कारण आजचा युवक हा उज्वल भविष्याचा आधारस्तंभ आहे असे सांगितले. यावेळी भारत माध्यमिक शाळेत घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना तहसीलदार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक मंडळी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती करण्यासाठी सामूहिक शपथ ग्रहण केली.