मानोरा(Washim):- मानोरा तहसील कार्यालयाच्या इमारतचे बांधकाम होवुन ५० वर्षाचा कालावधी लोटला आहे. ही इमारत पार मोडकळीस आली असल्याने तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत व्हावी, या उदेशाने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे(Assembly constituencies) आमदार राजेद्र पाटणी यांनी शासनाकडे शर्थीचे प्रयत्न करून कोटयावधी रूपये निधी मंजुर करुन घेतला.
कार्यालय स्थलांतर होण्याची प्रक्रिया लवकरच
येणाऱ्या काळात तहसील कार्यालयाची सुसज्य इमारत (Building)साकारण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाची इमारत १९८० च्या दरम्यान निर्माण झाली होती. सद्यस्थितीत ही इमारत मोडकळीस आली असून गेली पाच दहा वर्षापासून डागडुजी सुरू होती. पावसाळ्यात छत जागो जागी गळत असल्यामुळे त्यावर प्लास्टिक टाकून, टिनाचे ठीगळे लावून कशीबशी इमारत्त तग धरून उभी होती. त्यामुळे तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत व्हावी.अशी मागणी जनतेतून वांरवार केली जात होती. याला प्रतीसाद देत मतदार संघाचे आमदार स्व. राजेद्र पाटणी यांनी राज्य शासनाकडे(State Govt) लावुन धरली होती. एकाच छताखाली विविध कार्यालये व्हावी, यासाठी पाटणी यांनी प्रयत्न चालविले होते.
नवीन प्रशासकीय इमारत अंदाज पत्रकानुसार १२ कोटी ४२ लक्ष रुपया मध्ये साकारणार
अशा पद्धतीचा कोटयावधी ररूपये आराखडा मार्च २०२३ मध्ये मंज़ुर करुन घेतला. नवीन प्रशासकीय इमारत अंदाज पत्रकानुसार १२ कोटी४२ लक्ष ररूपये मध्ये साकारणार असुन या नवीन प्रशासकीय इमारती मध्ये तहसील कार्यालय, तालुका कुषी विभाग कार्यालय(Department of Agriculture Office), सहाय्यक निबंधकाचे कार्यालय एकाच छताखाली साकाऱले जाणार आहे. तसेच मानोरा नगर पंचायतीच्या इमारती साठी सुद्धा आमदार राजेद्र पाटणी यांनी कोटया वधी रूपये निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला होता आज नगर पचायतीची इमारत्त दिमाखात उभी झाली असुन लोकार्पनाच्या प्रतीक्षेत उभी आहे. तालुक्यातील दोन मोठया इमारती साठी निधी खेचून आणण्यात स्व. राजेद्र पाटणी यांचा सिंहासा वाटा आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयाची पर्यायी व्यवथ्या शहरात करण्यात यावी
नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याच्या हालचाली होत असल्याने तालुक्या तील नागरीकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु तहसील कार्यालय इमारत संपूर्ण तयार करायला दोन वर्षाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे नवीन इमारत उभी होईपर्यंत तहसील कार्यालय मानोरा शहराबाहेर स्थलांतर करू नये. तहसील कार्यालयाला जुनी ग्राम पंचायत इमारत अथवा नवीन नगर पंचायतची इमारत पुरेशी आहे. शासनाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जसे शहराबाहे विठोली येथे केल आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते, तसे नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयाची पर्यायी व्यवथ्या शहरात करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकाकडून केल्या जात आहे.