मानोरा (Washim) :- रेशनचा लाभ घेण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थ्याने ई – केवायसी (E-KYC)करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तो पर्यंत केवायसी न केल्यास शिधापत्रिका मधील त्या सदस्याचे राशन बंद केले जाणार आहे. गावात नसणारे त्यांनी केवायसी न केल्यास तसेच लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांचे ठसे जुळत नसल्याने तते रेशनाच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
केवायसी न केल्यास शिधापत्रिका मधील त्या सदस्याचे राशन बंद केले जाणार
गरीब कुटुंबाला शासनाकडून मोफत धान्य उपलब्ध दिला जात आहे. मात्र काही बोगस लाभार्थी याचा लाभ घेतात. काही नागरीक मृत्यू(Death) पावले तरी त्यांच्या नावाने उचल सुरूच असते. तसेच काही नागरीक बोगस रेशन कार्ड बनवून धान्याची उचल करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने शिधापत्रिका मधील प्रत्येक लाभार्थ्यांना ई – केवायसी करणे अनिवार्य केले आहे. मागील अनेक महिन्यापासून याबाबत सुचना करण्यात आली होती. मात्र काही नागरीक याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत होते. आता मात्र केवायसी करण्यासाठी २८ फेब्रुवारी ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर धान्य बंद होणार आहे. रेशनची उचल करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी रेशन दुकानदार यांच्याकडे असलेल्या पॉस मशीनवर लाभार्थ्याचा अंगठा किंवा डोळ्यांनी ओळख पटविली जाते. मात्र जेष्ठ नागरिकांचे अंगठ्या सह इतर बोटांमध्ये वयोमानामुळे बदल झालेला असतात.
त्यामुळे त्यांचे थंब पॉस मशीन स्वीकारत नाही. आयरस स्कॅनर मशीनच्या सहाय्याने ओळख पटविली जाते, परंतू मोती बिंदूमुळे ते ही काम करत नाही. त्यामुळे प्रत्येक दुकानात किमान शंभर ते दिडशे ज्येष्ठ नागरिक व बालके असे आहेत की, त्यांची के वायसी होणे शक्य नाही. या लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे घेऊन रास्त भाव दुकानदार त्रस्त झाले आहेत.