मालेगाव (Washim):-तालुक्यातील वाकळवाडी येथील एका आरोपीस महिलेच्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा मालेगाव न्यायालयाने ३ मे रोजी सुनावली.
२०२० मध्ये वाकळवाडी येथील पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार,घटनेच्या दिवशी ल पीडित महिला ही गावातील विहिरीवर पाणी भरण्याकरिता गेली होती. तेव्हा त्याच गावातील आरोपी नंदू परसराम याने मागून येऊन तिची कंबर पकडली. तिला खाली पाडुन तिचा विनयभंग (molestation) केला. याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०७/ २०२० कलम ३५४ ,३५४ ( अ ) भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला होता. न्यायाधीश जी. एस. बडगुजर यांच्या न्यायालयात (Courts) सदर प्रकरण चालले. सरकारतर्फे अॅड. सौ.एम. एस. सुपारे यांनी याप्रकरणी तीन साक्षीदार तपासले . फिर्यादी पीडितेची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली .पिडीतेची व तिच्या पतीची साक्ष ग्राह्य धरून विद्यमान न्यायालयाने आरोपीस सजा सुनावली . कलम ३५४ भादंवी प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आरोपीस ठोठावण्यात आली. या प्रकरणात सरकारतर्फ अॅड. सौ. सुपारे यांनी कामकाज पाहिले.