रिसोड(Washim):- तालुक्यातील वडजी बसथांबा ते मादनी वडजी शिवरस्त्या पर्यंत होणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडुन आहे. या रस्त्याके सार्वजनिक बांधकाम (Public works) उपविभागाला लक्ष देण्याला वेळ नसुन बोगस काम करणा-या कंत्रादराला एक प्रकारे अभय मिळत आसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व बोगस प्रकारे होत आहे
मागील अनेक दिवस होऊन गेले रस्ता उकरून टाकला. रस्त्याच्या बाजुलच्या नाल्या बुजून टाकल्या त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने पुर्ण रस्त्याने चिखल झालेला होता. यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व गावकऱ्यांना खुप त्रास होत आहे, मागील 8 दिवसामध्ये 3 अपघात झाले असुन यामध्ये प्रवाशांना किरकोळ मार सुद्धा लागला. याला जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यावर लक्ष्य देतील का असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असुन संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.आणि रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण करावे.