वाशिम (Washim Police) : कार्यालयीन काम करून देण्यासाठी 2500 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या स्थानिक (Washim Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, पाच जून रोजी (Washim Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आरोग्य क्षेत्रात खळबळ, अडीच हजारांची लाच भोवली
माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून त्यावर सही शिक्का घ्यावयाचा होता. या कामाकरिता आरोपी लोकसेवक सचिन शिवाजीराव बांगर (कार्यालयीन अधीक्षक जिल्हा सामान्य रुग्णालय) याने तीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती 2 हजार पाचशे रुपये स्वीकारण्याचे बांगर याने मान्य केले. उल्लेखनीय म्हणजे, सापळा कारवाईदरम्यान पंचांसमक्ष सदर रक्कम त्याने स्वीकारली. या प्रकरणी शहर (Washim Police) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लूचपत प्रतिबंधक (ACB network) विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोहवा नितीन टवलारकर, विनोद मार्कंड, योगेश खोटे आदीच्या पथकाने सदर कारवाई केली.