मानोरा(Washim):- मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे हातोली येथे दि. ३ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकली असता लाखो रुपयाचा मुद्दे माल जप्त आरोपी विरुध्द गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला.
आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
पोलिसाकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी राजेश आनंदा राठोड (वय ४३) यांच्या घरी पोलीसांनी प्रो रेड करुन ५० लिटर गावठी हात भट्टी दारु ५००० रूपये व ८०० लिटर सडवा मोहामाच किंमत १ लाख २० हजार रुपये , २ क्विंटल ४० गूळ ९६००, तुट्टी ५० किलो २००० व दारु काढण्याचे इतर साहित्य १०००० हजार असा एकूण १ लाख ४६ हजार रुपयाचा चा प्रो माल पोलीसांनी पचासमक्ष जप्त केला. विरूद्ध कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत बारे, डी बी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन पुणेवार, स. फौ. रविन्द्र राजगुरे, पोशी मनिष अगलदरे, रोहन तायडे, यांनी केली.