मंगरूळपीर (washim rain) : मंगरूळपीर परिसरात आज दिनांक ९ मे रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या विजेच्या कडकडाटासह (washim rain) पावसामुळे तालुक्यातील जांब प्लॉट येथे वीज कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरी १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील जांब येथील घटना
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, जांब प्लॉट येथे अंगणवाडीच्या बाजूला डीपी जवळ चार जण उभे असताना अचानकच (washim rain) वीज चमकली व दोघेजण पळाले. कु.दुर्गा मंदाबाई कांबळे, वय १५ वर्ष, आणि कु.र वीना धम्मपाल सुर्वे वय १४ वर्ष राहणार जांब प्लॉट यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये दुर्गा कांबळे हिचा जागेवरच मृत्यू झाला. तर रवीना सुर्वे ही गंभीर जखमी झाली, असून तिच्या डोळ्याला इजा झाल्याचे माहिती मिळाली आहे.
मृतक दुर्गा कांबळे हिचे शेव विच्छेदनासाठी (Mangrulpir hospital) मंगरूळपीर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक दुर्गा कांबळे हिच्या लहान बहिणीचा दोन दिवसापूर्वी मोटरसायकल अपघात झाल्याने ती अकोला येथे उपचार घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिवारावर संकटाचा डोंगरच कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे