- बेसुमार वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचे संतुलन अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात
वाशीम (Washim) उंबर्डा बाजार :- मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच (Nature) दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर (Government Level) झाडे लावा, झाडे जगवा (Plant trees, live trees) या मोहिमेचा कितीही उदघोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाही आहे. उंबर्डा बाजार (Umbarda Bazaar) वन परिक्षेत्रात राजरोस वृक्षांची कत्तल ही बाब नित्याचीच झाली आहे. वृक्षहे पृथ्वी व पर्यावरणाचे (Earth and environment ) चैतन्य आहे. बेसुमार वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचे संतुलन अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात दिवसेंदिवस ढासळत चालले असून असमतोल वाढला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर शतकोटी वृक्ष लागवडी सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यासाठी कोट्यवधींचा खर्च होतो. दुसरीकडे मात्र शेतामधील हजारो झाडांवर ठेकेदारांच्या (contractors) माध्यमातून कुन्हाड चालविली जात आहे.
वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
उंबर्डा बाजार परिसरात (Umbarda Bazar area) तोडून ठेवलेल्या लाकडांमुळे मोकळ्या मैदानांना जणू लाकूड आगाराचे स्वरूप आले आहे आंबा, चिंच, टेंभुर्णी, बोर, जांभूळ अशा फळझाडांसोबतच कडुलिंब, अंजन, कीन, बाभूळ, मोह, सागवान अशा वृक्षांची लागवड शेतशिवारात केली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सध्या लाकूड ठेकेदार करीत आहेत. जळाऊ लाकूड वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्यासाठी परवानगी वनविभागाची लागते.
शेतातील झाडे तोडून मोकळ्या जागेत ठेवली जातात
■ सध्या उंबर्डा बाजार व सोमठाणा वन परिक्षेत्रातील दिघी, सुकळी, दुघोरा, मनभा, पिंप्री (वरघट), पिलखेडा तथा परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक लाकूड ठेकेदार व व्यापारी (Contractors and Traders) या व्यवसायात स्थिरावले आहेत. या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वृक्षसंपदेवर त्यांचा डोळा आहे.