मानोरा(Washim):- हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होऊन अनेक वाट सरूंना अपंगत्व आले आहे. देऊरवाडी – चिखली हा रस्ता यवतमाळ – वाशिम या दोन जिल्हयांना जोडणारा रस्ता असून २० गावातील नागरिकांना दररोज मानोरा तालुक्याचे ठिकाणे ये-जा करावे लागते.
रस्त्याने प्रवास करताना मोठे अडचणीचा सामना करत ये जा करावे लागते
शाळकरी (School)मुलांनाही याच रस्त्याने प्रवास करताना मोठे अडचणीचा सामना करत ये जा करावे लागते. रस्त्यांच्या डांबरीकरणाची वारंवार निवेदन प्रमाणपत्र देऊनही बांधकाम विभाग (Construction Department)कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याने दिनांक २६ जून रोजी चिखली येथे परिवर्तन शेतकरी संघटनेच्या(Farmers Association) वतीने रस्ता खोदो आंदोलन करण्यात येणार आहे. “रस्ते इमारती व पुलं विकासाचे पहिले पाऊल” हे ब्रीद केवळ शासनाच्या दप्तरापुरताच मर्यादित तर नाही ? असा प्रश्न या रस्त्यावर ये – करणाऱ्या नागरिकांना पडत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी मागील दोन वर्षांपासून परिसरातील गावकऱ्यासह नागरिक करीत आहेत. याबाबत परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार निवेदन देत असतानाही कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात न आल्याने चिखली येथे रस्ता खोदो आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन दिनेश गवई, रामराव चव्हाण, धर्मराज आडे, विवेक राठोड, विशाल राठोड, शिवम पवार आदींच्या उपस्थितीत होणार आहे.