मानोरा(Washim):- केंद्र शासनाने यावर्षी मुंग(Moong), उडीद, सोयाबीन सह इतर पिकांचे हमी भाव जाहीर केले असुन सोयाबीनला (soyabean) शासानातर्फे ४८९२ हमी भाव जाहीर केले आहे. सोयाबीन काढणीला सुरूवात झाली असल्याने नाफेडचे सोयाबीन केंद्र मानोरा येथे तालुका ठिकाणी तात्काळ सुरू करावे, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना जि. प. चे माजी अध्यक्ष अरविंद पाटील यांनी पाठवले आहे.
केंद्र शासनाने यावर्षी मुंग, उडीद, सोयाबीन सह इतर पिकांचे हमी भाव जाहीर
निवेदनानुसार नाफेड मार्फत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी कार्यक्रम नाफेडच्यावतीने शासन मार्फत राबविण्यात येत आहे. सोयाबीन पीक काढणीला सुरूवात झाली असुन काही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पीक आले आहे. जर नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीतर नाईलाजास्तव दिवाळी सण साजरा करण्यासाठी सोयाबीन बाजारपेठेत कमी भावात सोयाबीन विक्री करणार आहेत. त्यामुळे नाफेडचे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.