मानोरा(Washim):- तालुक्यात सध्या सोयाबीन काढणीला वेग आला असुन मळणीचा खर्च साडेतीन हजार येत आहे, तर सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत असताना शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने सरकारची घोषणा घोषणाच दिसत असल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झाले आहे.
मालाचा गैरफायदा घेऊन एकप्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू
नांगरणी, वखरणी, बियाणे, खत, पेरणी , निंदन, पाळ्या व फवारणी असा एकंदर खर्चाचे गणित लावले असता शेतकऱ्यांचा अंदर बट्टाचा खेळ झाल्याशिवाय राहत नाही. या शेतकऱ्यांचा एकंदर बाबीचा विचार केला असता केंद्र सरकार कडून पडणारे बाजारभाव आणि यामुळे शेतकऱ्यांच्या आतून होणारी आर्थिक हानी लक्षात घेऊन आर्थिक मदत द्यावी, यासाठी सोयाबीन खरेदीस हमीभाव आधार भूत केंद्रास मान्यता देवून सोयाबीनचे ४ हजार ८९२ रूपये प्रति क्विंटल हमी भाव देवून सोयाबीन खरेदी करण्याचे सांगितले. मात्र अजुन पर्यंत तालुक्यात हे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ३८०० रुपयापासून व ४२०० रुपयापर्यंत सोयाबीनची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांच्या सोयाबीन या मालाचा गैरफायदा करून शेतकऱ्यांच्या सोयाबीन या मालाचा गैरफायदा घेऊन एकप्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केल्याचे दिसुत आहे. तेंव्हा सरकारने शेतकऱ्यांचा एकंदरीत विचार करता तात्काळ हमी भाव केंद्र सुरू करावे, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करीत आहे.