■ खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामे
■ बैलजोडीची संख्या झाली कमी
वाशीम (Washim) :- मे महिन्याच्या (month of may) सुरुवाती पासूनच उन्हाचा जोर आणखी वाढला आहे. रोहिणी नक्षत्राला (Rohini Nakshatra) सुरुवात झाली असुन त्यामुळे शेतकरी कामाला लागला. खरीप हंगामातील पेरणी पूर्व शेतीची कामे शेतकरी उरकून घेत आहेत. तालुक्यात शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग धरला आहे. नैसर्गिक आपत्ती (natural disaster) आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति खालावली आहे. पूर्वी जमिनीची मशागत बैल जोडीने (A pair of plowing bullocks ) केली जात होती. त्यामुळे शिवारामध्ये या महिन्यांमध्ये बैलाच्च्या गळ्यातील गोघर घाटीचा मंजुळ आवाज ऐकावयास मिळत होता. परंतु, बदलत्या काळानुसार मशागत ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाते.
१३ जूनपासून होणार मृग नक्षत्रास प्रारंभ
गेल्या वर्षापर्यंत एकरी एकहजार भाव होता.(An acre was one thousand bhavas) चालु वर्षी त्यात वाढ होऊन दिड हजार पर्यत गेल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना या दराचा फटका बसला आहे. मालाला भाव मिळत नाही. गेल्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होऊन लागले आहे.
शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करतांना दिसून येते
उन्हाळी कांद्याची काढणी होऊन भावाअभावी कांदा साठवणूक केली आहे. शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे (tractor) करतांना दिसून येते आहे. नांगरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे करून पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बेले पाडण्याचे कामे सुरू आहेत. येत्या १३ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहे. यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे.