मानोरा (Washim) :- शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही तत्व रुजावी, त्यांना भारतीय लोकशाहीची जवळून ओळख व्हावी, त्यांना ही व्यवस्था शालेय जीवनात समजून घेता यावी. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. असे प्रतिपादन शाळेचे संचालक अभिजित देशमुख ह्यांनी विद्यार्थी शपथविधी सोहळा निमित्त कार्यक्रमात विचार व्यक्त केले. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र (Civics)शिकवण्याचा यशस्वी प्रयोग मानोरा शहरातील प्रतिष्ठित शाळा संत वामन महाराज इंग्लिश प्रायमरी शाळेनं केला आहे. विशेष म्हणजे एस. डब्लू. एम. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले आहेत. नुकतेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनियुक्त प्रतिनिधींचा शपथविधी सत्कार सोहळा शाळेत पार पडला.
शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली
यावेळी व्हर्सटाइल एज्युकेअर सिस्टीम(Versatile Education System),मुंबई संस्थापक अध्यक्ष डॉ अजय दरेकर, डॉ रूपाली देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. सोनाली पिंगळे, सौ. सुनीता पवार, जयंत कडबे, कल्पना ठाकरे, ओम राऊत , संतोष थोरवे, शाळेचे समन्व्यक ईश्वर राऊत, कार्यालय प्रमुख नितीन चगदळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही तत्व रुजावी, राजकारणाबाबत निर्माण झालेली उत्सुकता व विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अर्थ समजून मतदान हक्काचे प्रबोधन व्हावे याकरिता शाळेत निवडणूक (Election) प्रक्रिया, मतमोजणी व शपथविधीचा उपक्रम राबविण्यात आला. शालेय निवडणूक कमिटीच्या सर्व सभासदांनी नियोजन बद्ध पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या बाबत पालकांकडून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक होत आहे. शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली.
इयत्ता चौथी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला
मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली. इयत्ता चौथी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या वतीने विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीचे महत्त्व मुलांना पटवून सांगण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन (Guidance)केले. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी हि निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या. या निवडणुकीत १२ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी विद्यालयातील ५३० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी निवडले प्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या (Students)चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. गुरुवार (दि. २५) सकाळी १२ ते २ वाजता मतदान घेण्यात आले तर शुक्रवार (दि २६) पाच वाजता मतमोजणी (counting of votes)करून शनिवार (दि. २७) निकाल जाहीर करण्यात आला. शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी पदी कु. समृद्धी भोयर निवडून आली तर उप-प्रतिनिधी पदी चिं.सोहम जाधव हा निवडून आला आहे.
नुकतीच संपन्न झालेल्या या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची शहरात सर्वत्रच चर्चा
त्याचबरोबर शाळेच्या क्रीडा प्रतिनिधीची सुद्धा निवडून घेण्यात आली तर शाळेच्या (School) क्रीडा प्रतिनिधी पदी चिं.कर्मन्त भगत तर क्रीडा उप-प्रतिनिधी पदी चि. श्रीश क्षीरसागर ह्याची निवड झाली. एक्वा हाऊस कॅप्टन म्हणुन शाळेची विद्यार्थिनी कु.नेहा वैद्य म्हणून हिची निवड झाली तर कु. सारा आनम झरीफउल्लाह खान हिची व्हाईस कॅप्टन म्हणून निवड झाली. इग्निस हाऊस कॅप्टन म्हणुन शाळेची विद्यार्थिनी कु.संपदा मंगेश राऊत तर व्हाईस कॅप्टन म्हणून कु.स्नेहल सुनिल मालते हिची निवड झाली. टेरा हाऊस कॅप्टन म्हणुन शाळेची विद्यार्थिनी कु.आरल पवार तर उप-कॅप्टन म्हणुन कु.गुंजन दिलीप चंदनकार हिची निवड झाली आहे. व्हेंटस हाऊस कॅप्टन (Ventus House Captain) म्हणुन शाळेची विद्यार्थिनी कु.प्रणाली राजेश्वर चव्हाण, तर उप-कॅप्टन म्हणुन शाळेचा विद्यार्थी चिं.अर्णव गोपाल चव्हाण ह्याची निवड झाली. नुकतीच संपन्न झालेल्या या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची शहरात सर्वत्रच चर्चा होत आहे.