वाशीम (Washim Tehsildar) : तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द (Pilgrimage to Pohradevi and Umri Khurd) येथे येथील मंदीर बांधकामाला लागणारे गौण खनिज (royalty ) चे प्रमाणपत्रावर तहसिलदार यांची खोटी स्वाक्षरी (Forged signature of Tehsildar) पोहरादेवी येथील भिका रामदास राठोड (Bhika Ramdas Rathore) या व्यक्तीने केल्याचा प्रकार उघडकीस आला असुन वडगाव शिवारातून हजारो ब्रास गौण खनिज (Murum ) ची रॉयल्टी काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोहरादेवी व उमरी खुर्द येथील प्रकार
पोहरादेवी व उमरी खुर्द येथे शासनाच्यावतीने (behalf of Govt )मंदिराच्या विकास कामासह विविध विकास काम सुरू आहे. सदर विकास कामे नागपूर येथील सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरू आहे. विकास कामासाठी लागणारे गौण खनिजपोहरादेवी येथील भिका रामदास राठोड या व्यक्तीने गेल्या काही दिवसात सुमारे एक हजार ब्रास मुरूमाची रॉयल्टी तहसिलदार (Tehsildar) यांची खोटी स्वाक्षरी करून काढलेली आहे. सदरील प्रकार धक्कादायक असुन यापूर्वीही अश्या प्रकारे खोटी स्वाक्षरी करून कोणी किती गौण खनिजाची रॉयल्टी काढली असेल याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे.
तालुकावाशियांचे लागले लक्ष
गौण खनिज प्रमाणपत्रानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी ३०० ब्रास, १९ ऑक्टोंबर रोजी २०० ब्रास, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ४०० ब्रास एवढे प्रमाणपत्र खोटी स्वाक्षरी करून रॉयल्टी काढण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी व तहसिलदार दोशीवर कोणती कार्यवाही करणार याकडे तालुका वाशियांचे लक्ष लागले आहे. तिन्हीही गौण खनिज रॉयल्टी प्रमाण पत्रावरील स्वाक्षरी माझी नाही. त्यावेळी मी रुजूही झालो नव्हतो. तहसिलदारांची खोटी सही करून गौण खनिज रॉयल्टी काढणे ही बाब गंभीर आहे. सदरील प्रकरणाची चौकशी सुरू असुन दोषीवर कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया विचारले असता तहसिलदार डॉ संतोष येवलीकर यांनी दिली.