– न. प. चा विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वाशीम ( Washim ) कारंजा नगर पालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांतर्गत (development work) रस्ते व नाल्या (Roads and drains under) या मुलभुत सुविधांची कामे केली जात आहेत. परंतु स्थानिक अतिक्रमण हा मुद्दा समोर येत असताना विकास कामांत अनेक अडचणी निर्माण होत आहे. यात सामान्य नागरिकांना डावलून अतिक्रमणधारकांना न्याय देण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कारंजा शहरातील शांतीनगर भागातील नालीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे अर्धवट
– विकास की, अर्थ विकास हा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरात घाण साचत असून, या घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. या संदर्भात स्थानिकानी न. प मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन खोदकाम केलेल्या नाल्याचे बांधकाम पूर्ण करावे, ही मागणी केली . परंतु संबंधीत अधिकारी (officer) गेल्या काही दिवसांपासून हजर नसल्याने हे काम रखडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विकास कामांतून खरोखर शहराचा विकास की, अर्थ विकास हा प्रश्न उपस्थित होत आहे. रखडलेल्या कामांमुळे एखादवेळी अपघात घडल्यास अथवा आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असे शांतीनगर परिसरातील रहिवाशांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. (ता.प्र.)