रिसोड(Washim) :- वाशिम जिल्ह्यात हरण, नीलगाय, माकड,रानडुक्कर या सारख्या वन्य प्राण्यांनी हैदोस घातला असुन शेती पिकांचं मोठया प्रमाणत नुकसान होत असून शेतकरी राजा वैतागुन गेला आहे. काही ठिकाणी हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने (Forest Department) याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतक-या मधुन होत आहे.
विहरीवरील सोलर पंप प्लेट वानराने तोडफोड करुन सोलर चे मोठे नुकसान
रिसोड तालुक्यातील पवार वाडी येथील शेतशिवारातील अतुल पवार व राहुल पवार यांच्या विहरीवरील सोलर पंप प्लेट (Solar pump plate) वानराने तोडफोड करुन सोलर चे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात वानराचा मोठयाप्रमाणत कळप वाढल्याने रब्बीतील गहु, हराभरा, संत्रा बागेचं नासधुस करीत असल्याने शेतक-या समोर मोठे संकट उभे राहीले आहे. वन विभागाने काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वन विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.