मानोरा(Washim):- राज्याच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेल्या बंजारा समाज बांधवांना राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महायुती सरकारने या सर्व समस्या सोडवून सकल बंजारा बांधवांना न्याय द्यावा, असे निवेदन राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भाजपाचे युवा नेते भक्तराज महाराज राठोड यांच्या नेतृत्वात समाज बांधवांच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
ना. फडणवीस यांची राजधानीत घेतली भेट
ना. फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मागासवर्गीय बंजारा समाजाला मिळालेल्या तुटपुंज्या आरक्षणात उच्च वर्णीय धन दांडग्याची शैक्षणिक व नौकरी मध्ये होणारी घुसखोरी अविलंब थांबवून अशा घुसखोरावर कायदेशीर कारवाई (action) करण्यात येवून यासाठी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात यावी, वसंतराव नाईक विकास महामंडळाला अध्यक्ष नेमून महामंडळाला भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, तांडा सुधार योजनेचा निधी वाढवून ही योजना केवळ तांड्यावर राबवावी, प्रत्येक तांड्यात वाचनालय आणि व्यायाम शाळा निर्माण करून त्याचा कारभार ग्राम पंचायत मार्फत चालवावा, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या २५ बंजारा बहुल मतदार संघात भाजपा(BJP)पक्षाची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी द्यावी, संसद आणि राज्य विधी मंडळाच्या जेष्ठ सभागृहात समाज बांधवांना उचित प्रतिनिधित्व देण्यात यावे यासह इतर विविध व काही ज्वलंत समस्या उपमुख्यमंत्री कडे मांडून त्या सोडविण्याची मागणी शिष्ट मंडळाने केली. या भेट घेतलेल्या शिष्ट मंडळात भाजपाचे पदाधिकारी देवीदास राठोड, सौ छाया सुभाष राठोड, सदाशिव चव्हाण, डॉ मोहन चव्हाण, दुलसिंग राठोड, रितेश पवार व समाज सेवक सहभागी होते.