मानोरा(Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिंगडोह ग्राम पंचायत मागील आठ महिन्यापासून ग्रामसेवका विना असल्याने गावातील विकास कामे थांबली आहेत. एका ग्राम सेवकाची प. स. स्तरावरून नियुक्ती करण्यात आली असुन ग्राम सेवक चार्ज (charge)घेत नसल्याने नागरिकांची कामे सुध्दा खोळंबली आहे. त्यामुळे न्याय द्यावा, अशी निवेदनाद्वारे मागणी गट विकास अधिकारी याजकडे गणेश मानकर यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम सेवक सुरेश प्रल्हाद गावंडे यांची आठ महिन्यापुर्वी सिंगडोह ग्राम पंचायतच्या ग्रामसेवक पदी नेमणूक (appointment) झाली होती. मात्र त्यांनी आजपर्यंत चार्ज न घेतल्यामुळे ग्रामसेवक ग्राम पंचायतचा कारभार सुरू आहे. सिंगडोह ग्राम पंचायतला ग्राम सेवक नसल्याने गावातील विविध विकास कामे थांबली असुन नागरीकांचे सुध्दा कामकाजात बाधा निर्माण झाली आहे. सदरील समस्या सोडवावी, अशी मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे.